Monday, October 23, 2017

कशी नेणार जोमाने पुढे विद्यार्थी चळवळ....!

कशी नेणार जोमाने पुढे विद्यार्थी चळवळ....!
महाविद्यालय, विद्यापीठ यांच्या धोरणांवर आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणाºया विद्यार्थी संघटना आता दिसेनासे झाल्यात. विद्यार्थी हिताच्या व्यापक दृष्टिकोनातून सुरू झालेली विद्यार्थी चळवळ हल्ली त्याच्या मुख्य ध्येयापासून विचलित होताना दिसत आहे. राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांवर तर अलीकडे पुढाºयांच्या मुलांनी ताबा घेतला आहे. परिणामी विद्यार्थी संघटनांमधील वैचारिक बैठकच हरवत चालली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विचार केल्यास गेल्या काही वर्षामध्ये विद्यार्थी संघटना केवळ नावापुरते चमकोगिरी करत आहे. कोणत्याही सामाजिक, शैक्षणिक विषयावर प्रभावी भूमिका एकाही संघटनेने घेतलेली नाही. कोणताही विषय लावून धरलेला नाही़ शैक्षणिक गुणवत्ता, महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा, शिक्षणातील नवे प्रवाह याबाबत संघटनांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. एखाद्या सामूहिक प्रश्नांसाठी निवेदन द्यायचे, निदर्शने-धरणे करायचे़ बोटावर मोजण्याइतक्या वेळेपूरत्या घोषणाबाजी करायच्या, अन् फोटोसेशन झाल्यानंतर निघून जायचे, अशी काहीही प्रथा विद्यार्थी संघटनांमध्ये रूजली आहे. बहूतेक विद्यार्थी संघटनांची आंदोलने ही तर केवळ प्रसिध्दीपुरतीच झालेली आहे़ वर्तमानपत्र, प्रसिध्दी माध्यमांमध्ये आलेले मुद्दे हेरायचे, त्याच मुद्यावर ‘अर्थपूर्ण’ हीत पाहून निवेदन द्यायचे़ हा तर अनेकांची सवयच बनली आहे़ परीक्षा काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या सोईसाठी नियमांमध्ये बदल करायचे, एखाद्या संस्थाचालकाच्या सांगण्यावरून आंदोलन करायचे हे तर नित्याचेच होऊन बसले आहे. दबावतंत्राचा वापर करून सोईनुसार आपल्या मागण्या पूर्ण करायचे हा खेळ तर कित्येक वर्षांपासून ‘विद्ये’च्या प्रांगणात सुरू आहे. एखादा निर्णय प्रशासनाने दबावापोटी का होईना बदलला तर त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड करायची, असे काहीसे चित्र शैक्षणिक वर्तुळात हमखास पहावयास मिळते. या स्पर्धेबरोबरच विद्यार्थी संघटनांमध्ये गटा-तटाचेही राजकारण हल्ली खुपच बघावयास मिळत आहेत. अनेक पक्षाचे दोन- तीन नेतेमंडळी हमखास शैक्षणिक क्षेत्रामध्ये वावरताना दिसतात. कोणी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी तर कोणी प्रशासनासोबत ‘अर्थपूर्ण’ डिल करण्यासाठी वावरताना दिसतो. महाविद्यालय, विद्यापीठात येणारा विद्यार्थी मुळात कोºया पाटीसारखा असतो. या कोºया पाटीवर आपल्या विचारसणीचा पगडा राखण्यासाठी काही विद्यार्थी नेते मंडळी टपूर असतात. विद्यार्थी हित जोपासण्याऐवजी विशिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाऊन काम करतात. तर काही नेतेमंडळी आपल्या सग्यासोयºयांच्या हितासाठी कार्य करताना वावरतात. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्यापासून उत्तीर्ण होण्याची हमी देणारी टोळींचा संचारही शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढत आहे. ज्या विद्यार्थी संघटनांकडे राजकारणात जाण्याची शिडी म्हणून पाहिले जाते तिथे अशी ‘नेतेगिरी’ करणारी टोळकी कार्यरत असेल तर खºया नेतृत्वाची वाढ कशी होणार याबाबत साशंकता निर्माण होत आहे.
Tushar Wakhare
(नोंद- हे वाचल्यानंतर चमकोगिरी, स्वयंघोषित विद्यार्थी नेत्यांनी राग माणून घेऊ नये़ हे केवळ व्यक्तिगत मत आहे.)